
पालकांनी वाचावे आणि समजून घ्यावे: विद्यार्थ्यांना मुख्य प्रश्नपत्रिका आणि पुरवणी प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी दिल्याजातील. विद्यार्थ्यांनी मुख्य प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडविल्यासच पुरवणी प्रश्नपत्रिका सोडवावी. मुख्यप्रश्नपत्रिका अर्धवट सोडवून पुरवणी प्रश्नपत्रिका सोडविल्याचे आढळ्यास मुख्य आणि पुरवणी प्रश्नपत्रिकेतील मोजणी खालील प्रमाणे होईल आणि पुढील नियमानुसार त्यांचा निकाल जाहीर होणार.
1) मुख्य प्रश्नपत्रिकेतील न-सोडवलेले गणित ज्या गुणांचे आहेत ते मोजल्या जातील आणि तेवढ्याच गुणांचे किंवा गुणांन एवढे पुरवणी प्रश्चपत्रिकेतील सोडलेले प्रश्न ग्राह्य धरल्या (मोजल्या) जाणार नाहीत.
2) विद्यार्थांनी मुख्य आणि पुरवणी प्रश्नपत्रिका निळ्या अथवा काळ्या बॉल पेनाने सोडवावे. उत्तरे लिहिण्यासाठी कुठल्याही पेंसिलचा वापर करू नयेत.
3) चाणक्य अबॅकसची ही स्पर्धा दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त गणित सोडविण्याची आहे. त्यामुळे जो विद्यार्थी जास्ती-जास्त बरोबर प्रश्न सोडवेल तो विजेता असेल.
4) चाणक्य अबॅकसची ही स्पर्धा दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त गणित सोडविण्याची आहे. त्यामुळे जो विद्यार्थी जास्ती-जास्त बरोबर प्रश्न सोडवेल तो विजेता असेल.
5) एकाच गुणांवर दोन किंवा अधिक विद्यार्थी असतील तेंव्हा सोडविलेल्या प्रश्नांपैकी चुकलेले उत्तरे मोजून कमीत-कमी चुका करणारा विजेता ठरेल.
6) दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांचे सोडलेले प्रश्न आणि चुकलेले उत्तरे यात समानता असल्यास दोन्ही विद्यार्थाना एकाच स्तराचे वेगवेगळे पण सारख्या स्तराचे बक्षीसे दिल्या जातील.
7) पाल्याच्या अबॅकस शिक्षकाने त्याच्यासाठी सुचवलेला स्पर्धेचा ग्रुप मला मान्य आहे आणि स्पर्धेच्या व्यवस्थापनाकडे कुठल्याही क्षणी माझ्या पाल्याचा स्पर्धेचा ग्रुप बदलण्याबाबत तसेच स्पर्धेतील नाव रद्द करण्याबाबत अधिकार असतील याची मला जाणीव आहे.
8) परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर जर जाहीर निकालावर शिक्षकाला किंवा पालकांना आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांचे तपासलेले प्रश्नपत्रिका फक्त आणि फक्त संदर्भित (त्याच्याच) चाणक्य अबॅकस शिक्षकालाच दाखवण्यात येतील. कुठल्याही परिस्थिती किंवा स्वरूपात पालकांना तपासलेले पेपर्स उपलब्ध होणार नाही. याची पालक म्हणून आपण नोंद घ्यावी आणि हा तसेच वरील सर्व नियम मान्य असल्यास आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा.


